लोकसभा निवडणूक लढवणार नाही – सुषमा स्वराज

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी २०१९ मधील लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. आरोग्याचं कारण देत त्यांनी मंगळवारी इंदूरमध्ये ही घोषणा केली.

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सध्या मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्णय घोषित केला. मध्यप्रदेशातल्याच विदीशा लोकसभा मतदार संघातून त्या संसदेत प्रतिनिधीत्व करीत आहेत.

-Ads-

प्रकृतीच्या कारणास्तव आपण हा निर्णय घेतला आहे असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. आपण आपला निर्णय पक्षाला कळवला आहे. ते याबाबत निर्णय घेतील पण आपला विचार पक्का आहे असे त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)