मुंबई-गोवा महामार्ग चौपदीकरण 2021पर्यंत पूर्ण करणार 

राज्य सरकारची हायकोर्टात माहिती 
मुंबई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील खड्डे गणपतीपूर्वी बुजविण्यास अपयशी ठरल्यानंतर हा महामार्ग चौपदरी करण्यासाठी दोन नव्हे, तर तीन वर्षांचा कालावधी लागेल. मार्च 2021 पर्यंत पूर्ण केला जाईल, अशी हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. तसेच या महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत सादर केले. याची दखल घेऊन याचिकेची सुनावणी डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवली.
या महामार्गावरील खड्यांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयातील वकील ऍड. ओ. ए. पेचकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागिल सुनावणीच्यावेळी राज्य सरकारने मार्च 2020पर्यंत चौपदरीकरणासाठी डेडलाईन निश्‍चित केली होती.
त्यावेळी न्यायालयाने ही तरी डेडलाईन पाळणार का अशी विचारणाही केली होती. राज्य सरकारच्या ऍड. मनीष पाबळे यांनी इंदापूरपासून पुढे गोव्यापर्यंत चौपदरीकरणाचे काम विविध टप्प्यात राज्य सरकार पूर्ण करणार आहे. मार्च 2021 पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी हमी देताना लांजा येथे झालेला अपघात हा खड्ड्यामुळे न होता चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच या महामार्गावर धोक्‍याचे फलक आणि सुरक्षेची उपयायोजना करण्यात आल्याची माहिती दिली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)