ओडिशात आयुष्यमान भारत योजनेसाठी जनमत संघटीत करणार : भाजप 

भुवनेश्‍वर: केंद्र सरकारने गरीब कुटुंबांना वैद्यकीय उपचार खर्चासाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली आहे. तथापी त्या योजनेत राज्य सरकारवरच भार टाकण्यात आला असून लोकांसाठी ती योजना फारशी लाभदायक नसल्याने ओडिशा राज्याने त्या योजनेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारला या योजनेत सहभागी होण्यास भाग पाडण्यासाठी राज्यातील भारतीय जनता पक्षाने या योजनेच्या समर्थनार्थ एक कोटी स्वाक्षऱ्या गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

दुर्गा पुजेपुर्वी या एक कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन आम्ही राज्यपालांना सादर करणार आहोत असे भाजप नेत्यांनी सांगितले. राज्यात बिजु जनता दल सरकारने त्यांची स्वताची अशी अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा भाजपचा आरोप असून त्या प्रकरणी प्रत्येक तालुक्‍याच्या बीडीओंना घेराव घालण्याचा इशाराही भाजपने दिला आहे. 27 ऑक्‍टोबर पासून हे आंदोलन सुरू होणार आहे. 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)