… तरच राज्यात वाढेल माळढोकची संख्या

वनविभाग-वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटचे सर्वेक्षण

पुणे – गवताळ प्रदेश नष्ट होत असल्यानेच माळढोक या राजबिंड्या पक्ष्याचे आस्तित्व धोक्‍यात आल्याची चर्चा पूर्वीपासूनच आहे. पण, आता याला दुजोरा मिळाला असून राज्यात एकही माळढोक पक्षी दिसला नाही, अशी नोंद झाली आहे. ही धक्‍कादायक माहिती वनविभाग आणि वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील माळढोक पक्ष्यांबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वनविभागाने नुकतेच सर्वेक्षण केले. यादरम्यान राज्यात एकही माळढोक पक्षाची नोंद झाली नाही. दरम्यान, यात 1,401 पैकी 72 जणांनी सर्वेक्षण परिसरात माळढोक दिसल्याचे मान्य केले आहे. राज्यात सध्या आठपेक्षा कमी माळढोक पक्षी असून, शेवटचा पक्षी अहमदनगर येथे आढळला होता. त्यामुळे राज्यात अजूनही काही पक्षी असण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार राज्यातील 12 विभागांपैकी 11 क्षेत्रे माळढोक क्षेत्र म्हणून वनविभागाने घोषित केली आहेत. यापैकी बहुतांश भागांमध्ये खरीप पिकांचे उत्पन्न घेतले जाते.

गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये झालेले बदल, कीटकनाशकांचा वाढता वापर, स्थानिक कुत्र्यांचा वावर आणि विद्युत तारांमुळे माळढोकला धोका उद्‌भवत आहे. त्यामुळे माळढोक क्षेत्र परिसरात पारंपारिक शेतीपद्धती राबविण्यावर भर देणार असल्याचे पुणे विभागाचे वन्यजीव संरक्षक आर.के. वानखेडे यांनी सांगितले.

…पण, माळढोक आहेत 
सर्वेक्षणामध्ये एकही पक्षी आढळला नसला, तरी राज्यात माळढोक दिसल्याचे काही जणांनी मान्य केले आहे. त्यामुळे माळढोकच्या आणखी नोंदी घेण्यासाठी विभागातर्फे माळढोक क्षेत्रात नियमित पाहणी करण्याचा प्रस्ताव वनविभागाकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील 11 माळढोक क्षेत्रात वर्षातून दोन ते तीन वेळा याप्रमाणे दोन वर्षांसाठी पाहणी करणार असल्याचा प्रस्ताव विभागाकडे विचाराधीन आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)