WIKIPEDIA…ज्ञानाचा महासागर

बऱ्याचदा आपल्याला अनेक प्रश्‍न पडले की आपण गुगल नावाच्या जिनीची मदत घेतो. आपण इतक्‍या सहजरीतीने गुगल वर आपल्या मनातील संकोच मांडतो की आपल्याला जणू विश्‍वासच असतो की गुगल म्हणजे माहितीचा भंडार. पण खरंच का गुगल ज्ञानाचा खजिना आहे का? की त्या खजिन्याचा रस्ता दाखवणारा वाटाड्या? गूगल वर खरंतर फक्त संकेत स्थळांची  indexing  केलेली असते. मग नेमका हे ज्ञानाचे खजिने कोणतें? आज अशाच एका खजिन्याची माहिती आपण इथे घेणार आहोत.

जेंव्हा आपण गुगलवरील शोधांची यादी पाहतो तेंव्हा 80-90 % वेळा त्या यादीची सुरुवात ही एका विशेष संकेत स्थळाने होते, ते म्हणजे ‘WIKIPEDIA’. ‘WIKIPEDIA’. हा इंटरनेटवरील एक मोठा विनामूल्य ज्ञानकोश म्हणजेच इन्सायक्‍लोपीडिया (Encyclopedia) आहे.  ‘WIKIPEDIA’. तब्बल 299 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. 2001 मध्ये चालू झालेली ही कंपनी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता, कोणत्याही प्रकारची जाहिरात ना करता किंवा कोणत्याही प्रकारची नोंदणी न करता माहितीचा अथांग महासागर लोकांपर्यंत पोहोचवत आहे. ‘WIKIPEDIA’. वर माहिती कोणीही सहजगत्या मिळवू शकतो. पण ही माहिती ‘WIKIPEDIA’. कडे आधीपासूनच आहे असे नाही. ‘WIKIPEDIA’.वरील माहिती तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांनीच upload केलेली आहे.

WIKIPEDIA च्या webpages मध्ये ज्याच्याजवळ तथ्य माहिती आहे अशी कोणीही व्यक्ती बदल करू शकतो. या माहितीची तथ्यता WIKIPEDIA चे moderator पडताळून पाहतात आणि मगच हि माहिती online दिसते. जेव्हा एखाद्या विषयाची सत्यता पडताळता येत नाही तेव्हा त्या लेखाच्या सुरुवातीसच तसे नमूद केले जाते. जर तुम्हाला  WIKIPEDIA चा एखादा लेख वाचताना त्रुटी दिसल्या तर कोणताही संकोच ना बाळगता तुमचं login तयार करून तुम्ही त्यात बदल करू शकता. पण तुम्ही दिलेली माहिती सत्य असेल तरच upload होईल.

WIKIPEDIA  चे अजून एक वैशिष्टय म्हणजे ती एक बिगर व्यावसायिक कंपनी आहे.  WIKIPEDIA कोणत्याही प्रकारची जाहिरात करत नाही. ना की तुमच्या कडून कुठले शुल्क आकारले जाते. WIKIPEDIA ही केवळ डोनेशन वर चालणारी कंपनी आहे. त्यामुळे या पुढे कधीही तुम्ही एखाद्या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी  WIKIPEDIA वर गेलात आणि ज्ञानाच्या या अथांग महासागराचं पाणी तुम्ही चाखले तर कृतज्ञता म्हणून का होईना त्या लेखा मागे लागलेली मेहनत जरूर आठवा आणि जमल्यास थोडे का होईना पण डोनेशन जरूर करा.

– श्रीकांत पाटील


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)