मुंबई –अभिनेता ‘विकी कौशल’ साकारणार महाभारता मधील ‘अश्वत्थामा’ ची भूमिका. या पूर्वी विकी कौशल ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आला होता. ‘उरी’ सिनेमातीलत त्याच्या भूमिकेचं चाहत्यांनी प्रचंड कौतुक केलं होत. विकी कौशल आता चक्क महाभारतातील दुर्लक्षित पण तितकीच गूढ व्यक्तिरेखा म्हणजेच ‘अश्वत्थामा’ याची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्तानं ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ची टीम पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘उरी’चे दिग्दर्शक आदित्य धर करणार असून निर्मिती रॉनी स्क्रूवाला करणार आहेत. आदित्य धर ‘उरी’ प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘अश्वत्थामा’च्या स्क्रिप्टवर काम करत होते. येत्या काही महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.