थकबाकी असलेल्या ओप्पो कंपनीवर मेहेरबानी का?

मोबाईल कंपनीकडून थकबाकी वसूल करावी,गेल्या साडेतीन वर्षांपासून थकले साडेबारा कोटी रुपये

पुणे- महापालिका हद्दीत गेल्या साडेतीन वर्षांपासून ओप्पो मोबाइल कंपनीने जाहिरात फलकांचे तब्बल साडेबारा कोटी रुपये थकविले आहेत. सन 2016 पासूनची ही थकबाकी असतानाही कंपनीकडून मोठ्या प्रमाणात शहरभर जाहिरात केली जात आहे. त्यामुळे संबधित कंपनीवर पालिकेने तातडीने कारवाई करून थकबाकी वसूल करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी महापालिकेकडे केली आहे.

-Ads-

ओपो कंपनलीकडे गेल्या साडेतीन वर्षांपासून थकबाकी आहे, अशी कबुली खुद्द महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने दिली असून संबधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

याबाबत भानगिरे म्हणाले, शहरात ओप्पो मोबाइल कंपनीने अनेक दुकानांवर जाहिरात फलक लावलेले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 3 लाख चौरस फूट जाहिरात या फलकांवर करण्यात आली आहे. त्यानुसार, कंपनीने महापालिकेस प्रति चौरस फूट 222 रूपये शुल्क भरणे आवश्‍यक आहे. मात्र, कंपनीने गेल्या 2 वर्षांपासून हे शुल्कच भरलेले नाही. ही रक्कम जवळपास बारा कोटी रूपये आहे. त्यामुळे ही रक्कम दंडासह वसूल करावी, अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)