महिला सबलीकरणाची गरज कशाला?

नुकताच महिला दिन संपूर्ण जगात साजरा झाला, तर याच पार्श्‍वभूमीवर शाहरूख खानने महिलांसंदर्भात नेहमी वापरल्या जाणाऱ्या “सबलीकरण’ या शब्दावर प्रश्‍न उपस्थित केला आहे. महिला या पहिल्यापासूनच बलशाली असल्यामुळे या शब्दात मला दम वाटत नाही. महिला सबलीकरणाच्या गप्पा या ग्रहांचे संरक्षण केल्यासारखे आहे. तुम्ही ग्रहाचे संरक्षण करत नसता, तर ग्रह तुमचे रक्षण करतात, असे सांगत त्याने महिलांची तुलना ग्रहांशी केली. तसेच महिलांना समान वागणूक देण्याचा सल्ला त्याने दिला.

शाहरूख खानला बॉलीवूडमधील रोमान्स किंग म्हणून ओळखला जात असला तरी पुरुषांपेक्षा महिलांसोबत काम करणे अधिक चांगले वाटते, असे त्याने म्हटले होते. शाहरूखचे हे वाक्‍य फक्‍त “रोमान्स’शी निगडित अजिबात नव्हते, तर शाहरूख स्वत:च्या आयुष्यात महिलाचे स्थान विशेष असल्यामुळे तो महिलांसोबत अधिक मोकळेपणाने वावरताना दिसतो. लहान वयात वडिलांचे छत्र हरपलेल्या शाहरूखची जडणघडण ही त्याच्या आईने केली आहे. त्याच्या आयुष्यात आईला फार महत्त्वाचे स्थान आहे. आईच्या प्रभावामुळेच महिलांविषयी अधिक आत्मियता असल्याचे शाहरूखने “रईस’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. महिलांना अधिक समजू शकतो असे मला कधीच वाटत नाही. मात्र, त्यांच्यासोबत मी अधिक बिनधास्तपणे राहू शकतो, असे तो म्हणाला होता. शाहरूख महिलांसोबत नेहमीच एक वेगळी संवेदना असल्याचे दाखवून देतो. कदाचित त्याच्या या गुणामुळेच महिलांमध्ये शाहरूखची लोकप्रियता दिसून येत असावी.

– प्राची पाठक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)