वाचा का आहे सुनील शेट्टीचा मुलगा अहान ‘टॉप ट्रेंड’ मध्ये

सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी हा सध्या ट्विटरवर टॉप ट्रेंडच्या लिस्ट मध्ये असून यामागचे कारण आहे त्याचा ‘अपकमिंग’ चित्रपट. अभिनेता सुनील शेट्टी याने आपल्या मुलाच्या अपकमिंग चित्रपटाबाबत ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली. अहानला नावाजलेला सिनेनिर्माता साजिद नाडियावाला ‘लाँच’ करणार असल्याची माहिती देत सुनीलने त्याच्या मुलाला शुभेच्छा दिल्या.

सुनील शेट्टीने पोस्ट केल्यानंतर अहानच्या ‘लाँच’ची माहिती ट्विटरवर वाऱ्यासारखी पसरली. याबाबत स्वतः अहानने देखील ट्विट करत साजिद नाडियावाला यांचे आभार मानले. तो लिहतो की, “आज माझ्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे. नाडियावाला यांच्या चित्रपटाचा भाग असणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी आयुष्यातील या टप्प्यावरील अडथळ्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.”

-Ads-

दरम्यान साजिद नाडियावाला हे सुपर हिट तामिळ चित्रपट ‘आरएक्स १००’ याचा हिंदी रिमेक बनवत असून यामध्ये अहान मुख्य भूमिकेत असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)