ओएनजीसीच्या शेअरचा भाव न्यूनतम पातळीवर का ?

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ही भारतातील सर्वांत मोठी कच्चे तेल व नैसर्गिक वायू उत्पादक कंपनी आहे जी एकूण देशातील एकूण उत्पादनाच्या सुमारे ७०% उत्पादन करते. हेच कच्चे तेल मग इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम यांसाठी कच्चा माल असते ज्यातून पुढं पेट्रोलियम पदार्थांची म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसीन, इ.ची निर्मिती करता येते. त्यामुळं कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमती, २०१८ वर्षाअखेरीस थंडावलेलं उत्पादन जे मागील सात वर्षांतील उत्पादनापैकी सर्वांत कमी होतं, तसंच सरकारची बायबॅकसाठी मनधरणी व त्यातच कंपनीच्या मालकीच्या लहान मोठ्या अशा १४९ तेल क्षेत्रांची विक्री. या सर्वांचा परिणाम म्हणून महारत्न कंपनीचा शेअर हा इतका स्वस्त म्हणजे केवळ प्रति शेअर अर्थार्जनाच्या सव्वा पाच पट भावात (पीई) उपलब्ध आहे, ज्यावर कंपनीनं रु. ५.२५ लाभांश देखील जाहीर केलेला आहे ज्याची अंतिम तारीख (एक्स डेट) २८ फेब्रु. आहे, म्हणजेच ३.९ % यील्ड.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)