का होतोय नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांचा व्हिडीओ व्हायरल ?

नवी दिल्ली- लोकसभा 2014च्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून जवळपास सर्वच पक्षांना भुईसपाट केले होते. याचा धडा घेत सर्वच पक्ष सोशल मीडियावर सक्रिय झाले आहे. त्यामुळे या 2019च्या निवडणुकीसाठी पुन्हा सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. अशातच  दिल्लीतील भाजपच्या कार्यालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची सोमवारी बैठक झाली.यावेळी बैठकीसाठी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी देखील उपस्थित होते. बैठकीसाठी सुषमा यांच्या बरोबरच गडकरी देखील कार्यालयात पोहोचले. तेव्हा गडकरी यांनी स्वराज यांना नमस्कार केला. तेव्हा स्वराज यांनी गडकरींच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी दोन्ही नेत्यांचे कौतुक करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)