99 वर्षांच्या करारावर मालमत्ता का देतात? (भाग-२)

99 वर्षांच्या करारावर मालमत्ता का देतात? (भाग-१)

99 वर्षांसाठीच करार का
ठराविक रकमेच्या बदल्यात मालक (भाडेकरारावर देणारा) आणि ग्राहक (करारावर घेणारा) यादरम्यान एक करार असतो. यात मालमत्तेवर ताबा राहण्यासाठी दोघांच्या अधिकाराचा उल्लेख असतो. करारात नियम आणि अटींचा समावेश असतो. या अधिकारात मालमत्तेचे स्वरूप, कराराचा कालावधी, मालक आणि ग्राहकांचे कर्तव्य, अटी, टर्मिनेशन क्‍लॉज, वादाचा निपटारा याचा समावेश असतो. कराराचा दीर्घ कालावधी ठेवण्यामागे एक उद्देश म्हणजे जमिनीचा वारंवार वापर आणि त्याच्या बदलाला रोखणे होय. प्रारंभीच्या काळात सुरक्षित कालावधीसाठीचा पर्याय म्हणून पाहिले गेले आहे. हा करार सुरक्षित व्यवहाराची पावती देतो. त्याचबरोबर मालमत्तेवर मालकी राहण्यासाठी निश्‍चित केलेला कालावधी हा सुरक्षित मानला गेला आहे.

भाडेकरारासंदर्भात काही बाबी
न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीने केवळ भाडेकरारावर दिल्या जाणाऱ्या मालमत्तेवरच अपार्टमेंट बांधण्याची ऑफर दिली आहे. किंमत दिल्यानंतर या कराराचा कालावधी हा 999 वर्षांपर्यंत वाढवता येतो.
भाडेकरारावर दिलेली मालमत्ता खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला काही गोष्टी तपासून पाहाव्या लागतील. विक्रेत्याला स्थानिक विकास प्राधिकरणाकडून ट्रान्सफर मेमोरेंडम मिळाले की नाही, हे खरेदीदाराला पाहावे लागेल.
बिल्डर भाडेकरारावरच्या जमिनीवरही फ्लॅटचे बांधकाम करण्यास पसंत करतात. कारण त्याची किंमत फ्रीहोल्ड जमिनीच्या तुलनेत कमी असते.
बॅंक भाडेकराराच्या मालमत्तेला अर्थसाह्य करण्यास फारशी उत्सुक नसते. जर मालमत्तेचा कालावधी हा तीस वर्षापेक्षा कमी कालावधीचा राहिलेला असेल तर अशावेळी बॅंका कर्ज देण्याची तयारी दाखवत नाहीत.
भाडेकराराच्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची किंमत. अशा करारातील मालमत्तेची किंमत फ्री होल्ड जमिनीवर तयार झालेल्या मालमत्तेपेक्षा कमी असते.

– मिलिंद सोलापूरकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)