तरुण पिढी हृदयविकारांना का बळी पडत आहेत ? (भाग-१)

इंडियन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, भारतीयांमध्ये उद्‌भवणाऱ्या हृदयविकाराच्या धक्‍क्‍यांपैकी 50 टक्‍के धक्‍के हे पन्नाशीच्या आतील लोकांमध्ये होतात आणि एकूण हृदयविकारच्या धक्‍क्‍यांपैकी 25 टक्‍के हे चाळीसहून कमी वय असलेल्या भारतीयांना होतात. खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत शहरांमधील लोकांना हृदयविकार होण्याची शक्‍यता तिप्पटीने जास्त असते. ही आकडेवारी धक्‍कादायकच आहे.
आपला साधारणपणे असा समज असतो की वृद्ध व्यक्‍ती किंवा अयोग्य आहार असणाऱ्यांना, धूम्रपान करणाऱ्यांना किंवा लठ्ठपणाचा विकार असलेल्यांना हृदयविकाराचा धक्‍का बसण्याची शक्‍यता जास्त असते. तर मग बाह्यतः निरोगी वाटत असलेल्यांनाही हृदयाच्या या स्थितीचा सामना का करावा लागतो? आणि तो ही अशा वयात जेंव्हा त्यांनी आरोग्यदायी जीवन जगणे अपेक्षित असते.
वास्तवात मात्र हृदयरोग कसलाच भेदभाव करत नाहीत. ते कोणालाही होऊ शकतात. आज भारतीयांमधल्या कमजोर हृदयासाठी अनेक कारणे आहेत – खास करून तरुणांमधल्या… त्यापैकी तीन कारणे अशीः
प्रचंड ताणतणाव 
तणावाचा परिणाम हा हृदयाला नाजूक बनवणाऱ्या वर्तनावर आणि घटकांवर होतोः रक्‍तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, शारीरिक निष्क्रियता आणि असे इतर. आणि आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जगात, तणाव प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे.
या तणावाला बळी पडण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी, तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून दररोज कमीतकमी तीस मिनिटे तरी ध्यान आणि व्यायामासाठी द्या. एका संशोधनानुसार, जे लोक दररोज तीस मिनिटे व्यायाम करतात, ते स्वतःसाठी हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात.
निरोगी आयुष्य जगण्यासाठी किंवा तणावाचा सामना करण्यासाठी तुम्हाला निकोटीन किंवा मद्य यांसारख्या हानिकारक कृत्रिम उत्तेजकांची गरज नाही. तुम्ही या गोष्टींची जागा पोषक अन्नाला देऊ शकता. यामुळे फक्त व्यायाम करण्याचीच क्षमता वाढते असे नाही तर तुमच्या आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्य्‌ा अधिक मजबूत होता.
जर तुम्हाला वर उल्लेखलेल्या व्यसनांपासून मुक्ती हवी असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक औषधांचे सेवन सुरू करी शकता. ही औषधे शंभर टक्के नैसर्गिक आहेत आणि त्यांचे कसलेही दुष्परिणाम नाहीत. खरं म्हणजे, आयुर्वेदातील तज्ज्ञ व्यक्‍ती तुम्हाला एकच एक प्रकारचे ठराविक औषध देणार नाही, तर तुमच्या शरीराला लागू होईल अशा पद्धतीने तयार केलेले विशेष औषध देईल.
आरोग्य ही संपत्ती आहे ही म्हण तंतोतंत खरी आहे. आयुष्यातील सर्व काही – तुमचे यश, कुटुंब, दीर्घायुष्य आणि इतर – हे या महत्त्वाच्या घटकाचे परिणाम आहेत. तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या कामात कोणतीही तडजोड होणार नाही हे नक्की करून घ्या.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)