तरुण पिढी हृदयविकारांना का बळी पडत आहेत ? (भाग-२)

खाण्याच्या वाईट सवयी 
तणावपूर्ण जीवनशैली आणि कामाचे वाढलेले तास यामुळे खाण्याच्या सवयी अनियमित झाल्या आहेत. लोक फक्‍त जंक फुडच खातात असे नाही – तर त्यांच्या खाण्याच्या वेळाही नियमित नसतात. परिणामी, शरीराला आवश्‍यक असे पोषण मिळत नाही आणि त्याऐवजी, त्यात हानिकारक चरबी आणि विषारी पदार्थ भरले जातात.
खाण्याच्या वाईट सवयींमुळे लठ्ठपणा येतो, एक अशी गोष्ट जी तरुण पिढीमध्ये अगदीच सामान्य बनत चालली आहे. भारतातील लठ्ठ व्यक्तींची संख्या 2010 मधील 17.3 टक्‍क्‍यांवरून वाढून 2014 मध्ये 19.5 टक्‍के झाली आहे. महिलांमघ्ये हाच आकडा 1998 सालच्या 10.6 टक्‍क्‍यांवरून वाढून 2014 मध्ये 24.7 टक्‍के एवढा झाला आहे.
गुणकारी किंवा योग्य आहार हा आरोग्यदायी आयुष्यासाठी 70 टक्‍के जबाबदार आहे; तर व्यायाम हा उर्वरित तीस टक्‍क्‍यांसाठी जबाबदार आहे. त्यामुळे भरपूर पालेभाज्या आणि फळे खा. अवेळी भूक लागू नये आणि जंक फुड खाण्यास भाग पडू नये यासाठी कमी कार्बोहायड्रेटस्‌ (कर्बोदके किंवा पिष्टमय पदार्थ) आणि अधिक प्रथिने असलेले अन्नपदार्थ खा. यामुळे जास्त काम करावे लागल्यासही तुमच्यातील उर्जा कायम राहील.
मद्य आणि धूम्रपान 
माफक मद्यपान – दर दिवशी महिलांसाठी एक ड्रिंक आणि पुरुषांसाठी दोन ड्रिंक्‍स – काही लोकांना हृदय रोगापासून संरक्षण देते असे दिसते. पण आपली पिढी ही काही आता माफक प्रमाण किंवा नियंत्रण पाळणारी पिढी राहिलेली नाही.
मद्याच्या नियमित सेवनामुळे हृदयाचे ऱ्हिदम्स (ठोके?) अनियमित होतात ज्याला अऱ्हिदमियास म्हणतात. त्यामुळे रक्‍तातील ट्रायग्लिसराईड्‌सचे प्रमाणही वाढू शकते. त्याचबरोबर वाढीव कॅलरी सेवनही, हे वेगळे सांगायलाच नको. धूम्रपानामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते आणि रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती वाढते.
या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणजे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, वाईट कोलेस्ट्रॉलचा साठा आणि बरेच काही…

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)