पबजी खेळणाऱ्यांनो जरा आवरा

पबजीमुळे अनेक मित्रांनी आज संवाद साधणे बंद केले. कॉल केले तर डायरेक्‍ट कट आणि वरून कॉल का केला? मॅच तगडी सुरू होती?, असे फालतू प्रश्‍न आणि आपणच एक-दोन शिव्या ऐकायच्या. हे काही पटलं नाही त्यामुळे पबजी जाणून घेण्यासाठी मी सुद्धा पबजी खेळणं सुरु केलं. 2 ते 3 दिवस खेळलो आणि सवय लागायच्या आत गेम डिलीट केला. त्यामुळे वास्तविक परिस्थिती अशी की, भारतात 5 करोड लोकांनी आपलं काल्पनिक करिअयर तयार केलं. आणि ते भयानक आहे. कारण ते वास्तविक जगणं मान्यचं करत नाहीत. त्यामुळे पबजीसाठी कोणी बायकोला सोडले, कोणी जॉब सोडला तर काही जणांनी स्वतःचे प्राण गमावले. त्यामुळे गुजरात सरकारला जाग आली आणि त्याठिकाणी पबजी बॅन करण्यात आला. मात्र इतर राज्यात तो सुरूच आहे. हे व्यसन ड्रग्जच्या व्यसनापेक्षाही भयानक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नवीन अध्यायात मोबाइल गेम व्यसनदेखील मनोवैज्ञानिक श्रेणी म्हणून वर्गीकृत केले आहे.

आधीच आधुनिक युगात सवांद हरपत चालला आहे. त्यात आणखी भर पडली ती पबजीची. आज देशात नाही तर जगात पबजी गेम जेवढा लोकप्रिय झाला तेवढाच धोकादायकसुद्धा झाला आहे. या गेमला नशेचं स्वरूप प्राप्त झालं असून यातून बाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. घर-परिवार, मित्र, यानां सोडून एका काल्पनिक विश्‍वात पबजीप्रेमी जगत आहेत. या विश्‍वात चिकन डिनर आहे, कपडे, एनर्जी ड्रिंक, टू व्हीलर, फोर व्हीलर अश्‍या अनेक गोष्टी आहेत, मात्र करियर नाही काही दिवसांपूर्वी तर गाजियाबाद मध्ये एका युवकाने जन्मदात्या आईला सोडले तर याहीपेक्षा भयानक दिल्लीत पबजी खेळू दिला नाही म्हणून एका मुलाने आई-वडिलांची हत्या केली. अशी खूप प्रकरणे आहेत.

पबजीची सर्वच युवकांना सवय लागली असे नाही काही जण लिमिटमध्ये पबजी खेळतात. मात्र जे पूर्णपणे आहारी गेले त्यांनी लवकर जागृत होण्याची आवश्‍यकता आहे. कारण पबजी हळूहळू तुम्हाला त्याच्या जाळयात ओढतो, त्यामुळे मित्रांकडे दुर्लक्ष, कामावरचे प्रेम कमी होते, इत्यादी प्रकार घडतात आणि ते जाणवत नाही.

कोणतीही गोष्ट लिमिटच्या बाहेर केली तर तिचा उद्रेक होतो. त्यामुळे वेळेवर जागृत होण्याची आवश्‍यकता आहे. जर गेममुळे तुमचे करियर, तुमच्या ध्येयाकडे दुर्लक्ष होऊ शकते तर ते खरंच धोकादायक आहे. या गेमचं अस्तित्व देखील बाकी गेम सारख आहे. याआधी टेम्पल रन, मिनी मिलिशा आणि पोकेमॉन, असे अनेक गेम आले आणि गेले. त्यामुळे हा गेमही आजन्म टिकेल असे वाटत नाही. असो, पण वास्तविक जीवनात पबजीची नशा कारणाऱ्यानांवर झॉम्बी अटॅक करतील, याअगोदर त्यांनी करियरकडे लक्ष देण्याची गरज आहे.

– संदीप कापडे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)