संतुष्ट नगरसेवक नेमके काम कोणाचे करणार?

विखे-जगताप यांच्या संपर्कात कोण ?

उमेदवारांचे शर्थीचे प्रयत्न…
नगर शहरातून मताधिक्‍याने घेण्यासाठी दोन्ही उमेदवार शर्थीचे प्रयत्न करत असून, नगरसेवकांच्या संपर्कात राहत आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य हे ही काही लांब नसल्याचे अंधारात दिसत आहे.

 

रवींद्र कदम
नगर – लोकसभेची निवडणूक चांगलीच तापू लागली आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील भाजप- सेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यात सरळ लढत होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही उमेदवारांनी नगर शहरात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. यासाठी दोन्ही उमेदवारांकडून व खास विश्‍वासातील स्वतंत्र यंत्राना कार्यान्वित झाली असून, आजी-माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्यासाठी या यंत्रणा सरसावल्या आहेत. त्यामुळे हे संतुष्ट नगरसेवक कुणाचे काम करणार व कुणाच्या गळाला लागणार, अशी चर्चा सध्या नगर शहरात सुरु आहे.

एका पक्षाकडून महापालिकेच्या पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून सर्वाधिक मताधिक्‍याने निवडणून येण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांची मनधरणी करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती, असे समजते. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत लाखो रुपये खर्च करून अनेक नगरसेवक निवडून आले, तर काही खर्च करूनही काहींना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ही खळगी भरता येईल, या हेतूने काही नगरसेवक कार्यन्वित झाले. शहरातील एका हॉटेलमध्ये नामवंत पक्षाकडून बैठक आयोजित करण्यात आली. परंतु नामवंत पक्षाकडून तुटपुंजी ऑफर मिळाल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

महापालिकेला लाखो रुपये खर्च करून ते आजी-माजी नगरसेवक संतुष्ट असल्याचे दाखवत, साहेब, आम्हाला पैसे नको. आम्ही तुमचेच काम करणार, असे सांगत त्या’ नगरसेवकांनी बैठक आटोपती घेतली. त्यामुळे या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दम छाक होणार असून, कोण उमेदवार या नगरसेवकांची मनधरणी करणार व हे नगरसेवक कोणाचे काम करणार, अशी चर्चा सुरु आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)