कोण म्हणतेय मला ‘फ्लॉप अॅक्‍ट्रेस’

फॅशन किंवा रोलची निवड काहीही असो, सोनम कपूरची चॉईस म्हणजे एकदम परफेक्‍ट असते. असाच बी टाऊनचा समज आहे. सोनम नेहमीच जरा हटके विचार करते आणि तिचा विचार योग्य कसा आहे, हे सगळ्यांना पटवून देण्याचा आटापिटाही करते. तिच्या म्हणण्याशी असहमती दर्शवण्याची हिंमत कोणीच करून दाखवू शकत नाही.

डॅडी अनिल कपूरबरोबर प्रथमच तिने “एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा होमोसेक्‍स्युऍलिटी सारख्या विषयावरील सिनेमाही करण्याचे धाडस दाखवले. तिच्या या हटके विचार करण्यामुळे तिच्या वाट्याला बॉलिवूडमधील कमर्शियल सिनेमे फारच कमी येतात आणि तिला कमर्शियल सक्‍सेस फार मिळत नाही. ती फारच उंच आहे म्हणून तिला “जिराफ’ असे हिणवले जाऊ लागले होते. यामुळेच ती आता “फ्लॉप अॅक्‍ट्रेस’ व्हायला लागली आहे, असे ट्रोलिंग गेल्या काही दिवसांपासून व्हायला लागले आहे. तिच्या बॉलिवूड सक्‍सेसवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना तिने एकदा चांगलेच सुनावले. माझ्या करिअरमध्ये अखेरचा “फ्लॉप’ सिनेमा कोणता होता, हे मला तरी आठवत नाही. ट्रोल करणाऱ्यांनी प्रथम हे सांगावे असे सोनमने ट्रोलिंग करणाऱ्यांना विचारले. सात वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती. तेंव्हा आपल्याकडे सिनेमे नव्हते ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे तेंव्हा तिच्याकडे सिनेमे कमी होते, याची काही कारणेही होती. मात्र आताची स्थिती तशी नक्कीच नाही. “रांझणा’ नंतर तिने स्क्रीप्टचा व्यवस्थित अभ्यास करायला सुरुवात केली.

इंडस्ट्रीमध्ये खूप स्पर्धा आहे. पण तिच्या ऍक्‍टिंगला नेहमीच दाद मिळाली आहे. “भाग मिल्खा..’, “प्रेम रतन धन..’ आणि “संजू’मधील तिच्या रोलचे खूप कौतुक झाले. आता “द झोया फॅक्‍टर’मध्येही ती अगदी वेगळा रोल करते आहे. आता कोणाचीही इर्षा व्हायला नको, असे म्हणता येणार नाही. अगदी द्वेष करणाऱ्याचेही भले व्हावे असे मला वाटत असताना “फ्लॉप अॅक्‍ट्रेस’चा टॅग कशाच्या आधारे लावला जाऊ शकतो, असा तिला प्रश्‍न पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)