जर सगळेच निर्दोष तर ‘त्या’ ६८ जणांना कोणी मारले? : कपिल सिब्बल यांची समझोता बॉम्बस्फोट प्रकरणावर प्रतिक्रिया

नवी दिल्ली – समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी टिपण्णी करत न्यायव्यवस्थेवरच निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटरवर ट्विट करत कपिल सिब्बल यांनी न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काल समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली. बारा वर्षांपूर्वी झालेल्या या बाँबस्फोटप्रकरणी पंचकुलाच्या एका विशेष एनआयए ( NIA ) कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्यानंतर आज कपिल सिब्बल यांनी ट्विट करत,    ‘२००७: समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट… ६८ जण ठार… एनआयएने ८ जणांवर आरोप ठेवले… कोर्टाचा निकाल : ६८ जणांना कुणी मारलं कुणालाच माहीत नाही…आम्हाला आमच्या फौजदारी न्याय प्रणालीचा गर्व आहे! ‘ असे म्हंटले आहे.

https://twitter.com/KapilSibal/status/1108578229147832320

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)