मुठा कालवा फुटीला जबाबदार कोण?

उच्च न्यायालयाचा सवाल ः चौकशी करून अहवाल सादर करा

मुंबई –
मुठा नदीवरील कालवाच्या भिंती कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित करून याची विभागीय चौकशी करून अहवाल सादर करा अन्यथा आम्ही चौकशीचे आदेश देऊ, असे राज्य सरकारला बजावले.

पुण्यातील सिंहगड रोडनजीक मुठा नदीवरील कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ऍड. असीम सरोदे, विद्या बाळ, विश्‍वांबर चौधरी शिवाजी गदादे-पाटील आणि नगरसेविका प्रिया गदादे-पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित दाखल केल्या आहेत. या याचिकांवर वर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारने या कालवा दुर्घटनेनंतर घाई घाई मदतीची घोषणा केली. मात्र डोक्‍यावरचं हक्काचं छत हरवलेल्यांचे सध्या अतोनात हाल होत आहेत. त्यांना वैद्यकिय सेवा, शालेय विद्यार्थी, वृद्ध यांचे सध्या तात्पुरत्या निवा-यात हाल होत आहेत. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तर राज्य सरकारने याचिकाकर्त्यांचे बेकायदा बांधकाम असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून याचिका निकाली काढण्याची विनंती केली. याची गंभर दखल न्यायालयाने घेतली. तुम्ही तुमच्या चुकीच्या गोष्टींवर पांघरून टाकून न्यायालयाची दिशा भुल करून नका. झालेल्या दुर्घटनेला जाबाबदार कोण याचा आधी शोध घ्या विभागीय चौकशी करून अहवाल सादर करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)