नवी दिल्ली – दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्ली येथील भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मनोज तिवारी यांनी काही दिवसांपूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात सुमारे २४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. मनोज तिवारी हे उत्तर पूर्व दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
मनोज तिवारी यांच्याकडे १५.७६ कोटी आणि ८.५२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून, त्यांच्यावर १.३६ कोटी रुपयांचे कर्ज देखील असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मनोज तिवारी यांच्याकडे पाच कार आहेत. त्यामध्ये एडी क्यू ७, मर्सिडीज-बेंज, टोयोटा फॉर्च्यूनर, टोयोटा इनोव्हा आणि होंडा सिटी यांचा समावेश आहे. ज्यांचे सध्या बाजार मूल्य ५४ लाखांपेक्षा अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत २० टक्के एवढी वाढ झाली आहे. मनोज तिवारी यांना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित याचं आव्हान असणार आहे. मनोज तिवारी हे नॉर्थ इस्ट दिल्लीतून विद्यमान खासदार आहेत.