शेतकऱ्यांना वाली कोण

श्रीरंग काटेकर

राज्यसरकारने 26 जिल्हयातील 151 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. यामध्ये सातारा जिल्हयातील माण, दहिवडी अति गंभीर स्वरुपाचा दुष्काळ म्हणून जाहीर केला आहेत्र तर खटाव कोरेगांव हा ही दुष्काळाच्या छायेखाली असल्याचे नमुद केले आहे. जिल्हयातील दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहाता शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट व दैयनिय झाली आहे. जगावे का मरावे अशा स्थितीत शेतकरीबांधव सापडला आहे. शासनाच्या आशेवर असलेला शेतकरी बांधव जीवंतपणे मरणयातना भोगत आहे.

शेतीमालाला शासन दरबारी भाव मिळत नाही आणि निसर्गाची साथ लाभत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. दुष्काळामुळे डोळयादेखत उभी पिके करपून जात आहेत. तर अवकाळी पाऊसामुळे वाहून जात आहेत असे चित्र पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच शासन स्तरावरील पंचनाम्यातील अनागोंदीपणा आणि वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्याचे जीवन कोलमोडून गेले आहे. राज्यातील शेतीची भयानकता पाहाता सन 1972 च्या दुष्काळाची जाणीव शेतकरी वर्गाला होत आहे.

विदर्भ मराठवाडा बरोबरच कोकण विभागाला याचा मोठा फटका बसला आहे. नासिकमधील द्राक्ष, डाळींब मराठवाडयातील गहू, हरभरा तसेच नागपूरमधील नगदी पिकाबरोबरच संत्री, केळी तर कोकणातील आंबा बागाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील चार वर्षात जवळपास 50,000 हजाराहून अधिक शेतकरी बांधवानी आत्महत्या केल्याचे आकडेवारवरुन सिध्द झाले आहे. भारतीय रिझर्व बॅकेच्या एका अहवालनुसार ही धक्‍कादायक माहीती उजेडात आली आहे. सन 2014 – 15 ते 2018 या पर्यंतच्या कालावधीमध्ये देशार्तंगत शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहाजा किमान चारच्या सरासरीने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

ही भयानक स्थिती पाहाता भविष्यात ही राष्ट्रीय समस्या देशासमोर उभी राहणार आहे. सन 2014-15 मध्ये 12360, सन 2015-16 मध्ये 11602, सन 2016-17 मध्ये 1145सन 2017-18 मध्ये 14000 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन जीवन संपविले आहे. जनावरे मरावेत तशीच काहीशी अवस्था आज शेतकऱ्यांच्या वाटयाला आली आहे. दिवसरात्र काबाडकष्ट करुन ही हाताला काहीच लागेना, त्यातच निसर्गाची अवकृपेने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यापुढे आत्महत्याशिवाय पर्यायच उभा राहीलेला नाही. अशी भयानक स्थिती महाराष्ट्रातील व देशातील शेतकऱ्यांची झाली आहे. भविष्यात शेतकऱ्यापुढे अनेक मोठी आव्हाने उभी असताना समाजाचे ही या प्रश्‍नाकडे झालेले दूर्लक्ष ही सर्वात गंभीर बाब आहे.

धोक्‍यात आलेल्या शेती व्यवसाय ही मोठी समस्या भविष्य काळात देशाला भेडसावणारी आहे. देशातील शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण पाहता ही राष्ट्रीय समस्या म्हणून पाहणे गरजेचे आहे.रोजच्या या घडणाऱ्या घटनामुळे शेतकऱ्यांच्या गभीर समस्याकडे ज्या त्रीवतेने लक्ष देणे गरजेचे आहे. तसे घडत नाही ही खरी खंत आहे. आधुनिकतेचे स्वप्न पाहणारा भारत देश आज वेगवेगळया क्षेत्रात प्रगती साधत आहे. हे जरी वास्तव असले तरी देशातील मानवी जीवनाच्या होणाऱ्या हानीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही हे तितकेच सत्य आहे.

कृषी प्रधान देश म्हणून जागतिक स्तरावर गौरवलेला भारतातील शेतकऱ्यांची स्थिती मात्र बिकट आहे. देशातील सर्वच क्षेत्रातील क्रांतीमधील शेतकरी वर्गाचे महत्वपुर्ण योगदान असताना या वर्गाचे आत्महत्याचे वाढते प्रमाण हे चिंता जनक आहे. निसर्गातील घडणाऱ्या बदलामुळे शेती व्यवसाय हा अनिश्‍चित झाला आहे. अति पाऊसामुळे निर्माण होणारा ओला दुष्काळ व पाऊस न पडल्याने निर्माण कोरडा दुष्काळ या दृष्ट चक्रात सापडलेला शेतकरी वर्ग मेटीकुटीस आला आहे. जमीन आहे तर पाणी नाही, जमीन व पाणी आहे पण निसर्गाची साथ नाही. अशा केविल वाणी परिस्थितीतून शेतकरी आपले जीवन जगत आहे.या शेतकऱ्याला वाली कोण याचे उत्तर कोणी देईल काय ?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)