राफेलच्या करारातील मधला मलिदा कोणी खाल्ला? : शरद पवारांचा सवाल

प्रातिनिधिक छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माढा येथे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थिती लावत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाबाबत शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून माहिती दिली आहे. या कार्यक्रमाबाबत माहिती देतानाच त्यांनी ट्विटरद्वारे सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील जोरदार टीका केली असून मतदारांना देशामध्ये परिवर्तन आणण्यासाठी हाक दिली आहे.

राफेलवरून मोदींवर टीकास्र 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणायचे ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ मग राफेलसारखा मोठा भ्रष्टाचार झालाच कसा, राफेल विमानांची किंमत बदलली कशी, राफेलच्या करारातील मधला मलिदा कोणी खाल्ला, या साऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळायला हवे.”

नोटबंदी, जीएसटीवर टीका

“आज परिस्थिती भीषण आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे नोटा बदलण्यासाठी रांगेत असलेल्या लोकांचे हकनाक बळी गेले. देशातील दहशतवाद थांबला नाही. जीएसटीमुळे व्यापारी वर्गाचे मोठे हाल होत आहेत.”

देशामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी मतदारांना हाक

“अहवाल सांगतात की देशातील रोजगार कमी झाला, बेकारी वाढली. ही परिस्थिती बदलायची आहे. देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. सर्व भाजपविरोधी आणि संविधान मानणारे पक्ष एकत्र येत आहेत. आपल्याला या गोष्टीला एक व्यापक स्वरूप द्यायचे आहे. एकत्र येऊन काम केलं तर या सरकारला घालवता येईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)