व्हॉट्‌सऍप’ने आणले नवे फीचर 

नवी दिल्ली, दि. 18 – सध्याच्या सोशल नेटवर्किंग मध्ये सर्वात लोकप्रीय असणाऱ्या व्हॉट्‌सऍपया सोशल नेटवर्किंग ऍपने अनावश्‍यक गृपमध्ये ऍड होण्यापासून रोखणारे एक नवे फिचर आणले असून त्या फिचरमुळे आता युजरची डोके दुखी कमी होणार आहे.

व्हॉट्‌सऍप वर अनेक गृप आहेत. त्यात अनेकांना त्यांच्या इच्छेविरुद्धच गृपमध्ये जोडले जात असते. काही वेळा एकदा गृपमधून बाहेर पडल्यावरही पुन्हा एकदा त्यामध्ये “ऍड’ केले जाते. त्यामुळे युजरला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या कटकटीतून युजर्सची सुटका करण्यासाठी व्हॉट्‌सऍपने नवे फीचर आणले आहे. या नव्या वैशिष्ट्‌यानुसार एखाद्या नव्या गृपमध्ये आपल्याला कोणी समाविष्ट करावे, याबाबतचे अधिकार व्हॉट्‌सऍपने थेट युजरला दिले आहेत.

यानुसार प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन नोबडी, माय कॉंटॅक्‍ट्‌स अथवा एव्हरीवन या पर्यायांपैकी एका पर्यायाची युजरला निवड करता येईल. आपल्या संमतीशिवाय कोणत्याही ग्रुपशी जोडले जाण्यास इच्छुक नसणाऱ्या युजरनी यातील “नोबडी’ या पर्यायावर क्‍लिक केल्यास संभाव्य डोकेदुखीपासून सुटका होऊ शकेल. हे नवीन फिचर लवकरच व्हॉट्‌सऍप बेटावर दाखल होणार असून त्यानंतर व्हॉट्‌सऍपच्या नव्या व्हर्जनमध्ये ते उपलब्ध केले जाईल. त्यामुळे गृपच्या कटकटीपासून दूर राहू इच्छिणाऱ्यांना याचा भरपुर फायदा होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)