पराभव लाजिरवानाच…पण, लढा दिल्याचे समाधान : ब्रेथवेट

चेन्नई – दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर एकदिवसीय मालिकेत कामगिरी उंचावलेल्या वेस्ट इंडीजने टी-20 मालिकेत भारतीय संघासमोर सपशेल शरणागती पत्करल्यानंतर बोलताना विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने संघाच्या कामगिरी बद्दल बोलताना सांगितले की, मालिकेतील एकतर्फी पराभव लाजिरवाणाच आहे. मात्र, अखेरच्या सामन्यात शेवतच्या चेंडूपर्यंत भारतीय संघाला झुंजविल्याचा अभिमान आहे.

भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेतही वेस्ट इंडीजला एकतर्फी पराभूत होताना 0-3 अशा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, अखेरच्या सामन्यात विंडीजच्या संघाने चांगलाच लढा दिला, मात्र, अखेरच्या चेंडूवर 1 धाव वाचवता न आल्याने त्यांन सामन्यात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे भारताने त्याम्ना 0-3 अश्‍या फरकाने व्हाईटवॉश दिला. त्याबद्दल बोलताना ब्रेथवेट म्हणाला की, ही लाजिरवाणी बाब असली, तरीही आम्ही लढलो आणि निकराची झुंज दिली, याबाबत आम्ही आमच्या कामगिरीवर समाधानी आहोत.

3-0 अशा फरकाने पराभूत होणे हे माझ्यासाठी कर्णधार म्हणून आणि संघासाठी वाईट आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. मात्र, आमची कामगिरी आणि आम्ही भारतीय संघाला दिलेली झुंज ही या सामन्यातील आमच्यासाठीची समाधानाची बाब होती. आम्ही संघ म्हणून एकत्रित आलो आणि आमच्या संघातील खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला हेच आमच्यासाठी महत्वाचे होते आणि हेच या टी20 मालिकेचे आमच्यासाठी मोठे संचित आहे, असेही ब्रेथवेटने यावेळी सांगितले आहे.

पहिल्या सामन्यात आम्ही आमच्या गोलंदाजीची चुणूक दाखवून दिली आणि भारताला अखेर पर्यंत विजयासाठी झुंजवले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात आम्हाला म्हणावा तसा चांगला खेळ करता आला नाही म्हणुन आम्ही हा सामना एकतर्फी गमावला. मात्र, तिसऱ्या सामन्यात आम्ही पुन्हा चांगला कामगिरी करत सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला. आणि आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि संघाला 181 धावांची मजल मारुन दिली. तर, आमच्या गोलंदाजांनी भारताला अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजवले. त्यामुळे आम्ही सामना जरी गमावला असला तरी या सामन्यातून आम्ही भरपूर काही कमावले आहे.

त्याच बरोबर त्याने नवोदीत फलंदाज निकोलस पूरनचे कौतूक करताना सांगितले की, पूरन हा नवोदित जरी असला तरी त्याने आपल्या फलंदाजीतून आपल्यामधिल कर्तुत्व सर्वांना दाखवून दिले आहे. त्याने गरजेच्या वेळी वेगवान खेली करताना केवळ 25 चेंडूत 53 धावा करताना संघाला 181 धावांची मजल मारून दिली. यात त्याच्या धमाकेदार खेळीचेच कौतूक नसून त्याने यावेळी अनेक चांगले फटके खेळले. यासामन्यात त्याने सुरुवातीला संघाला गरज असल्याने संथ फलंदाजी केली. मात्र, नंतर गरजेच्या नूसार आपल्या फलंदाजीचा वेग वाढवला. तसेच सामना हातातून गेला असताना 19व्या आणि 20व्या षटकात आमच्या गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारताला सहज विजय मिळवू दिला नाही. हे या सामन्याचे वैशिष्ट होते असे मला वाटते. असेही त्याने यावेळी नमूद केले.

तसेच त्याने मधल्याफळीतील फलंदाज डॅरेन ब्राव्होचे देखिल कौतूक करताना सांगितले की, ब्राव्होने यावेळी 43 धावांची खेळी करताना पूरनच्या साथीत महत्वपूर्ण भागिदारी नोंदवली. यावेली ब्राछोने मोठे फटके न मारता आपली विकेट वाचवून संघाला जशी गरज होती तशी फलंदजी केली हे त्याच्या फलंदाजीतील वैशिष्ट असून त्याच्या सारख्या अनुभवी खेळाडूंमुळे संघात समतोल राखला जातो हे महत्वाचे आहे. आम्हाला आता आगामी बांगलादेशच्या दौऱ्यावर जायचे असून भारताचा दौरा आमच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही. मात्र, आम्ही बांगलादेशच्या दौऱ्यामध्ये आम्ही आमच्या कामगिरीमध्ये सुधारणा होइल अशी मला अपेक्षा आहे. असेही तो यावेळी म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)