अमेरिकेलाही पावसाचा फटका व्हाईट हाऊसमध्ये शिरले पाणी 

वॉशिंग्टन (अमेरिका)  – अमेरिकेला सोमवारी मुसळधार पावसाचा तडाखा बसला. पावसामुळे वॉशिंग्टन शहरांसह अन्य ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक आणि जनजिवन विस्कळीत झाले असतानाच पावसाचे पाणी व्हाइट हाउसच्या तळमजल्यावरील कार्यालयात शिरल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. व्हाइट हाउसचा आजूबाजूचा भाग देखील पाण्याखाली गेला आहे.

वॉशिंग्टनमधील बहुतांश भागाला पुराचा फटका बसला आहे. तसेच पुराच्या पाण्यात रस्त्यावरील अनेक गाड्या बुडाल्या आहेत. अनेक लोक कारगाड्यांच्या छतावर चढून मदत मागत असल्याचे दिसत आहे. यूएस नॅशनल रेल रोड पॅसेंजर कार्पोरेशनने खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण वॉशिंग्टनमधील रेल्वे सेवा रद्द केली आहे. नॉर्थवेस्टर्न डीसी, मोंटगोमरी काउंटी, इस्ट सेंट्रल लॉडन काउंटी, अर्लिंगटन काउंटी, फॉल्स चर्च आणि नॉर्थइस्टर्न फेयरफॅक्‍स काउंटी येथेही पुराच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. पोटोमॅक नदीला पूर आला असून या नदीच्या आजूबाजूच्या भागात धोका वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)