वैयक्‍तिक कर्ज घेताना… (भाग-१)

सध्याच्या काळात वैयक्तिक कर्ज घेणे खूपच सोपे झाले आहे. जर आपल्याला पैशाची गरज असेल तर पर्सनल लोन हे कमी काळात आपली गरज भागवण्याचे काम करते. बॅंका वेळोवेळी आपल्या खातेदारांना पर्सनल लोनसाठी प्री अप्रूव्हड ऑफर देखील देतात. अर्थात आपल्याला पर्सनल लोनसाठी अर्ज भरताना काही खबरदारी घ्यावी लागते. आपली एक चुकी अडचणीत आणू शकते. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना आपल्याकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांची माहिती इथे देता येईल.

कर्जफेडीच्या क्षमतेचे आकलन न करणे
पर्सनल लोन हे सहजपणे मिळते. नागरिकही त्यासाठी तातडीने अर्जही करतात. मात्र कर्ज घेण्यापूर्वी पर्सनल लोन रिपेमेंट करण्याच्या क्षमतेचे योग्य रितीने आकलन केले जात नाही. जर आपण परतफेडीची क्षमता पडताळून पाहिली नाही तर आपण आर्थिक अडचणीत सापडू शकतो. अशा स्थितीत आपण सहजपणे हप्ता कितीपर्यंत भरू शकतो, त्यानुसार कर्ज घ्यावे. यासाठी ठराविक रकमेसाठी किती महिन्यांसाठी किती हप्ता बसेल, याची माहिती बॅंकेकडून घ्यावी. त्यानुसारच
परतफेडीची क्षमता समजू शकेल.

वैयक्‍तिक कर्ज घेताना… (भाग-२)

वैयक्तिक कर्जासाठी अनेक बॅंकांशी संपर्क
बहुतांश नागरिक हे पर्सनल लोन घेण्यासाठी अनेक बॅंकांशी संपर्क करतात आणि माहिती जाणून घेतात. आपण जेव्हा एखाद्या बॅंकेशी पर्सनल लोनसंदर्भात चौकशी करतो तेव्हा ती बाब क्रेडिट रिपोर्टमध्ये येते. प्रत्येक चौकशीबरोबर आपला क्रेडिट स्कोर कमी होत जातो. जर आपण कमी वेळेत अनेक बॅंकांकडे कर्जाबाबत चौकशी केली तर आपला क्रेडिट स्कोर खराब होतो. अशा स्थितीत एखाद्या बॅंकेकडे आपण पर्सनल लोनसंदर्भात अर्ज केला तर ती बॅंक आपल्याला नाकारू शकते किंवा जादा व्याजदराची आकारणी केली जाते.

– सतीश जाधव

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here