वैयक्‍तिक कर्ज घेताना… (भाग-२)

वैयक्‍तिक कर्ज घेताना… (भाग-१)

सध्याच्या कर्जाचे विवरण न देणे
जर आपण एखाद्या बॅंकेत वैयक्तिक कर्जासाठी अर्ज देत असाल आणि आपल्यावर अगोदरच काही कर्ज असतील तर त्याची माहिती बॅंकेला देणे बंधनकारक आहे. या माहितीच्या आधारे आपल्याला किती कर्ज द्यावे, हे बॅंक ठरवते. जर आपण कर्जाची माहिती दडवून ठेवल्यास बॅंक आपला अर्ज नाकारू शकते. याशिवाय अधिक व्याजदराची आकारणीही करू शकते.

नियम आणि अटींचे आकलन नाही
वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना अर्जदार नियम आणि अटीचे वाचन योग्य रितीने करत नाहीत. बॅंक अधिकारी जेथे फुल्या मारतील तेथे आपण सही करतो. हा निष्काळजीपणा कालांतराने आपल्याला महागात पडू शकतो. कारण आपल्या काही वेळेस अकारण शुल्क भरावे लागते. म्हणूनच कर्ज घेताना करार, नियम व अटींची माहिती घ्यावी. वैयक्तिक कर्जावरील व्याजदर, अन्य शुल्कही जाणून घ्यावे.

दीर्घकाळासाठी कर्ज घेणे
बहुतांश पर्सनल लोन हे दीर्घकाळासाठी असतात. त्यामुळे त्यांचा मंथली हप्ता कमी होतो. मात्र, आपल्या कर्जाचा कालावधी जेवढा अधिक असेल त्याप्रमाणात आपल्याला व्याज भरावे लागते. अशा स्थितीत आपण क्षमतेनुसार कर्जाचा कालावधी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे व्याजाचे प्रमाण कमी राहील.

क्रेडिट रिपोर्ट न तपासणे
वैयक्तिक कर्जासाठी केलेला अर्ज हा बॅंक मंजूर करेल की नाही ही बाब क्रेडिट स्कोरवर अवलंबून असते. अशावेळी अर्ज करताना आपला क्रेडिट स्कोर पाहावयास हवा. जर आपला क्रेडिट स्कोर कमी असेल तर आपला अर्ज नाकारला जाऊ शकतो. कर्जाचा अर्ज फेटाळून लावल्याने आपल्या क्रेडिट स्कोरमध्ये आणखी घसरण होऊ शकते. अशावेळी क्रेडिट स्कोर वेळोवेळी पाहणे गरजेचे आहे.

– सतीश जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)