मतदारांना प्रियंका गांधींमध्ये इंदिराजी दिसतील : शिवसेना 

मुंबई : शिवसेनेद्वारे आज प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाबाबत आनंद व्यक्त करण्यात आला असून शिवसेनेतर्फे प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये देखील फायदा होईल असे भाकीत करण्यात आले आहे.

प्रियांका या त्यांच्या आजीप्रमाणे गुणसंपन्न असून त्यांचे व्यक्तिमत्व देखील इंदिराजींप्रमाणेच उठावदार आहे. असं देखील शिवसेनेतर्फे म्हणण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना, शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या की, “प्रियांका यांचे व्यक्तिमत्व हे त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच रुबाबदार आहे. आजपर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेल्या प्रियांका आता सक्रिय राजकारणामध्ये उतरल्यामुळे काँग्रेससाठी ही बाब फायद्याची ठरणार आहे. प्रियांका यांना मतदारांना कशाप्रकारे आकर्षित करावे ही कला चांगल्याने अवगत आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)