…तर विधानसभेची निवडणूक लढवेन – सुरेखा पुणेकर

पुणे –  अमेरिकेमध्ये लावणीमुळे पोहोचली. तर, मराठी मंडळाच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमांमध्ये लावणी सादर झाली. तर विधानसभेत का जाऊ शकत नाही. विधानसभेमध्ये गेल्यास लावणी कलाकारांचे प्रश्‍न मांडू शकते. मला चांगल्या पक्षाने तिकीट दिले तर नक्‍कीच विधानसभेची निवडणूक लढवेन, असे मत व्यक्त करत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या “सांस्कृतिक कट्टा’ या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे आदी उपस्थित होते. यानिमित्ताने सुरेखा पुणेकर यांनी “बिग बॉस’च्या घरातील अनुभवांसह विविध आठवणी सांगत “लावणीसम्राज्ञी’चा प्रवास उलगडला.

पूर्वी “लावणी एके लावणी’ अशी परिस्थिती होती. मात्र, आता लावणी “मिक्‍स’ झाली आहे. पारंपरिक लावणीचा प्रेक्षक सध्या राहिला नाही. पुरुषांना आवडणारी लावणी आता महिलांना आवडू लागली आहे. महिलांसाठी आम्ही विशेष कार्यक्रम देखील केला होता. मी देखील पुन्हा नव्याने लावणीचे कार्यक्रम सादर करणार आहे. पारंपरिक लावणीसह वेस्टर्नचीही जोड लावणी प्रकाराला देणार असल्याचे पुणेकर म्हणाल्या. बिग बॉसच्या घरामध्ये सहा आठवड्यांच्या मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. घरामध्ये गेल्यावर आम्हांला प्रतिस्पर्धी समजले. पहिले दोन दिवस फार काही समजत नव्हते. हळूहळू गोष्टी शिकत गेले. 24 तासांसाठी 15 माणसे एकत्र आली आणि भांडणाला सुरुवात झाली. मला घरामध्ये आईचा दर्जा मिळाली. घरातील काही काळ माझ्यासाठी दबावाचा आणि टेन्शनचा होता, असे “बिग बॉस’च्या घरातील अनुभव सांगताना पुणेकर यांनी नमूद केले. “अनुभवाने मी हुशार आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत माझी माघार आहे’, असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)