गृहकर्जाचा मार्ग सुकर करताना (भाग-१)

स्वत:च्या हक्काचे घर असावे, अशी सर्वसाधारण भावना असते. विशेषत: महानगरात, नोकरीच्या ठिकाणी भाड्याने राहण्यापेक्षा स्वत:च घर खरेदी करून शाश्‍वत गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. अर्थात या वेळी घराच्या वाढत्या किमती देखील लक्षात घ्याव्या लागतात.

आज घडीला मेट्रो सिटीतील टू बीएचके फ्लॅटची किंमत किमान 50 लाख आहे. त्यामुळे सर्वांनाच ही किंमत परवडते असे नाही. अशावेळी गृहकर्जाच्या मदतीने घराचे स्वप्न साकार करणे शक्‍य आहे. बॅंकांकडून गृहकर्जाबाबत उदार धोरण राबविले जात असले तरी काहीवेळा कागदपत्रांची जमवाजमव करताना अनेकांची दमछाक होते. त्यामुळे कोणत्याही अडचणींशिवाय गृहकर्ज घेण्यासाठी इथे काही बाबी सांगता येईल, जेणेकरून मालमत्ता खरेदीच्या हालचाली लवकर होतील. घर खरेदी म्हणजे भाजी मंडईतून भाजीपाला विकत घेण्याइतके सोपे नाही. त्यासाठी नियोजन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घर खरेदी आणि गृहकर्ज घेताना आर्थिक नियोजन, भविष्यातील जबाबदारीचे आकलन याचा विचार करण्याची गरज असून त्यानुसार कृती केल्यास भविष्यात अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

लवकर पावले उचला
जर आवडीच्या ठिकाणी तयार होत असलेल्या गृहकप्रकल्पाकडे आपले लक्ष असेल तर आणि किमतीचे देखील आकलन झाले असेल तर आपण घर खरेदीच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे समजावे. मालमत्ता खरेदीसाठी वयाचे बंधन नाही. तुम्ही वयाच्या पंचविशीतही घर घेऊ शकता किंवा पन्नाशी ओलांडल्यानंतरही घराचा विचार करू शकता.

गृहकर्जाचा मार्ग सुकर करताना (भाग-२)

अर्थतज्ज्ञांच्या मते, आपल्याकडे नियमित आणि सुरक्षित उत्पन्नाचे साधन असल्यास घर खरेदीचा विचार करायला हवा. एक घर खरेदीदाराच्या रूपाने आपण पहिल्या वेतनापासूनच मालमत्ता खरेदीसाठी बचतीला प्रारंभ करायला हवा. जबाबदारीत कितीही वाढ झाली तरी काहीना काही रक्कम नियमित रूपाने दरमहा बाजूला काढून घेणे हिताचे ठरते. तसे पाहिले तर बहुतांश नागरिक वयाच्या 30 किंवा 35 वयात गृहकर्जासाठी अर्ज करतात. कारण या काळात ते बऱ्यापैकी स्थिरावलेले असतात. यादरम्यान लग्न होते आणि पुढे अपत्यही होतात. या काळातच अनेकांचे राहण्याचे ठिकाणही निश्‍चित झालेले असते. तसेच डाऊनपेमेंट करण्यासाठी बऱ्यापैकी पैसाही हाताशी असतो.

– सुभाष वैद्य 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)