कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी “बफर झोन’ आहे कोठे?

बहुतांश प्रकल्प नागरी वस्तीत असल्याने आरोग्य समस्या वाढल्या
Where is the ‘buffer zone’ for the garbage processing project?

पुणे – शहर स्वच्छ करण्यासाठी धडपडणाऱ्या पुणे महानगरपालिकेला कचरा व्यवस्थापन नियमांचाच विसर पडला आहे. शहरात आवश्‍यक क्षमतेचे कचरा प्रकल्प कार्यान्वित नसतानाच, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि रहिवासी भाग यामध्ये “बफर एरिया’ म्हणजेच राखीव क्षेत्र असावे, हा नियम असूनही शहरातील एकही प्रक्रिया प्रकल्पासाठी “बफर झोन’ नाही. बहुतांश प्रकल्प हे नागरी वस्तीत असल्याने नागरिकांना आरोग्य समस्या भेडसावत आहे.
कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरातील नागरिकांकडून प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे नेहमीच तक्रारी येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशेषत: प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते, हवेचे प्रदूषण होते, त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्‌भवतात अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण जास्त असतात. त्यामुळेच महामंडळाकडून शहरातील कचरा प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. यावेळी कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि रहिवासी भाग यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी आवश्‍यक असलेले “बफर एरियाच’ नसल्याचे आढळून आल्याचे मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी सांगितले.

शहरात सध्या रामटेकडी, उरूळी कांचन, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट अशा विविध भागांमध्ये लहान-मोठे मिळून सुमारे 25 कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरात दररोज तब्बल 1,600 ते 1,700 टन घनकचरानिर्मिती होते. मात्र, या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प एकूण क्षमतेपेक्षा अतिशय कमी प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश कचऱ्यावर प्रक्रिया न होता, तो आहे त्याच स्थितीत पडून असतो, अथवा शहरात अन्यत्र पसरलेला असतो.

अनेकदा प्रक्रिया प्रकल्पाच्या क्षेत्रात आग लागण्यासारख्या दुर्घटना घडण्याची शक्‍यता असते. यामुळे नागरिकांना धोका उद्‌भवू शकतो. त्यामुळेच घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा प्रकल्प आणि रहिवासी भाग यांच्यामध्ये “बफर एरिया’ आवश्‍यक असतो. मात्र, शहरातील कचरा प्रकल्पांबाबत हा नियम डावलण्यात आलेला दिसतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)