जामीनदार होताना… (भाग-१)

भावंडांना कर्जाच्या रुपाने आर्थिक मदत करणे नातेसंबंधात तणाव निर्माण करण्याचे कारण बनू शकते. अशा स्थितीत जर आपले भाऊ किंवा बहीण जामीनदार होण्यास आपल्याला आग्रह करत असेल तर काय करावे? एक जुनी म्हण आहे. बाप बडा, न भैया, सबसे बडा रुपय्या. मालमत्ता, पैशावरून कुटुंबाचे विभाजन होत असल्याचे आपण ऐकले असेल किंवा अनुभवलेही असेल. कदाचित जामीनदार होताना आपल्याला नुकसान दिसत नसेल. परंतु कालांतराने ते कर्ज आर्थिक अडचणीत आणणारे ठरू शकते. दुसरे म्हणजे बहीण किंवा भावाला थेट नकार देता येत नाही. तरीही जामीनदार होण्यापूर्वी काही बाबी समजून घेतल्या पाहिजेत.

जामीनदार होताना… (भाग-२)

जामीनदाराची जबाबदारी कोणती?
आपण कोणत्या प्रकारची हमी घेतो किंवा कोणत्या प्रकारे जामीनदार राहता यावर आपली जबाबदारी निश्‍चित होत असते. जर आपण आर्थिक जामीनदार राहत असाल तर आपल्याला बहिण-भावाची जबाबदारी घ्यावी लागेल. त्यांनी कर्ज वेळेवर फेडले तरी त्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच राहील. जर नॉन फायनान्शियल जामीनदार असाल तर आपल्याला बॅंक आणि भावंड यांच्यात संवादाची कडी म्हणून भूमिका बजावावी लागेल. कर्जदार बॅंकेच्या क्षेत्रात राहत नसेल, तेव्हा अशा कर्जप्रकरणात राहणाऱ्या जामीनदाराला नॉन फायनान्शियल असे म्हणतात. याचाच अर्थ भाऊ किंवा बहिण वेळेवर कर्ज फेडत नसतील आणि बॅंक त्यांच्याशी संपर्क साधण्यास अपयशी ठरत असेल तर त्यांचा शोध घेण्यासाठी बॅंक आपली मदत घेईल. एवढेच नाही तर थकबाकी भरण्यासही आपल्याला सांगितले जाईल. जर आपण फायन्शियल गॅरेंटर असाल तर आपल्याला संपूर्ण कर्ज फेडावे लागेल. परिणामी आपल्या नातेसंबंधात ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

– राकेश माने 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here