जामीनदार होताना… (भाग-२)

जामीनदार होताना… (भाग-१)

जबाबदारीतून मुक्ती
जर आपल्या हमीवर भाऊ-बहिणीने 20 वर्षाचे गृहकर्ज घेतले असेल तर जोपर्यंत आपण दुसरा जामीनदार देत नाही तोपर्यंत बॅंक आपल्यावरच जबाबदारी निश्‍चित करेल. आपल्या भावंडांना हप्त्यावर विमा कवच घेण्याचा सल्ला द्या. याचा फायदा म्हणजे हप्ते अडकून पडल्यास अडचण येणार नाही.

आर्थिक स्थिती जाणून घ्या
भावंडांना कर्ज देण्यापूर्वी बॅंक जामीनदाराची मागणी करत असेल तर आपल्याला भाऊ-बहिण यांची आर्थिक स्थिती आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहणे गरजेचे आहे. जामीनदारावरून बॅंकेची वेगवेगळी पॉलिसी आहे. मात्र खराब क्रेडिट स्कोर असेल तर, आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर किंवा उत्पन्नाचे निश्‍चित साधन नसेल तर बॅंक अशा स्थितीत जामीनदाराची मागणी करते. म्हणूनच भाऊ किंवा बहिण यांना जामीनदार राहताना त्यांची आर्थिक स्थितीची माहिती जाणून घ्या. अन्यथा कर्ज फेडण्यासाठी सज्ज राहण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते.

क्रेडिट स्टेटसवर परिणाम
जर आपण बहिण-भावासाठी जामीनदार राहत असाल तर त्यांच्याप्रमाणेच आपला क्रेडिट रेकॉर्ड तयार होईल. कर्जदाराने वेळेवर हप्ते भरले नाही तर त्याचा परिणाम आपल्या क्रेडिट स्कोरवर होईल. याशिवाय जर आपण 30 लाखाच्या कर्जावर जामीनदार असाल आणि नंतर थकबाकी होत असेल आणि जर 50 लाखाची गरज पडल्यास बॅंक 20 लाखाचेच कर्ज मंजूर करेल. यातून आपले काम बिघडू शकते तसेच बहिण-भावातील नातेसंबंधाही तणाव निर्माण होऊ शकतो.

– राकेश माने 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here