नवी दिल्ली – अभिनेत्री रिचा चढ्ढा सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावरून रिचाने अनेकदा ट्रोलिंगला न घाबरता आपले मत व्यक्त केले आहे. सध्या देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. त्यात रिचा पॉलिटीकली सक्रीय झाली असून रिचाने जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ‘टाईम’ मासिकाचे कव्हरपेज शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लागवला आहे.
When you can’t buy the Press overseas. https://t.co/LewZkhxi9H
— TheRichaChadha (@RichaChadha) May 10, 2019
रिचाने टाईमचं कव्हरपेज शेअर करत लिहिले की, जेव्हा तुम्ही परदेशी माध्यमे खरेदी करू शकत नाही तेव्हा असच होत. रिचाने आपल्या ट्विटमध्ये अप्रत्यक्षरित्या भारतीय माध्यमांना देखील टोला लगावला आहे. रिचाचा या ट्विटला प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी रिट्विट केले आहे.
तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय मासिक ‘टाइम’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता ‘ असा करण्यात आला आहे. टाइम मासिकाने आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यामधून मोदींच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला आहे. ‘देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?’ या शीर्षकाखाली हा लेख प्रसिद्ध केला आहे. हाच धागा पकडून रिचा चढ्ढाने मोदींवर निशाना साधला आहे.