बाॅलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर हे प्रकृती ठिक नसल्यामुळे अमेरिकेतील न्युयाॅर्कमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू सिंग कपूर हे देखील न्यूयॉर्कमध्ये आहेत. स्वत: ऋषी कपूर यांनी मागील महिन्यात ’29 सप्टेंबर’ रोजी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. तसेच त्यावरील उपचारासाठी मी अमेरिकेला जात आहे असे सांगितले होते. मात्र, पुन्हा एकदा ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एक भावनिक ट्विट केलं आहे. “आज मला न्यू यॉर्कला येऊन ८ महिने पूर्ण झाले. मला माझ्या घरी परत कधी जाता येईल?’ असं लिहून त्यांनी घरची आठवण येत असल्याचं सांगितलं आहे.
Today I complete eight months here in New York. When will l ever get home?
— Rishi Kapoor (@chintskap) May 30, 2019
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रीटी न्यू यॉर्कला असताना ऋषी कपूर यांना भेटले होते. त्यांना भेटल्यावर सोशल मीडियावर फोटोदेखील शेअर करण्यात आले होते.