जेव्हा राहुल गांधी एका तरुणीला म्हणतात सर नको राहुल म्हण… 

तामिळनाडू : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. आपल्या तामिळनाडू दौऱ्यादरम्यान ते चेन्नई येथील स्टेला मेरिस कॉलेजमधील विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी गेले होते. यावेळी राहुल गांधी यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना देखील उत्तरे दिली.

या कार्यक्रमादरम्यान स्टेला मेरिस कॉलेजमधील एक तरुणी काँग्रेस अध्यक्षांना प्रश्न करण्यासाठी उभी राहिली असता तिने राहुल गांधींना सर असे संबोधले. यावर राहुल गांधी यांनी लगेच आपल्याला तू राहुल असे संबोधले तरी चालेल असे म्हणताच उपस्थितांनी राहुल गांधींच्या साधेपणाला जोरदार दाद दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)