जेव्हा प्रियांका राजकारणात येईल तेव्हा लोक मला विसरतील : इंदिराजींनी केले होते भाकीत

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीला केवळ दोन-तीन महिनेच बाकी राहिले असताना कॉंग्रेसने आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. पक्षाने प्रियांका गांधी-वढेरा यांना राजकारणात उतरवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आले आहे. सध्या त्यांच्याकडे पुर्व उत्तरप्रदेशच्या प्रभारी म्हणूनही काम सोपवण्यात आले आहे. यातच ”एएनआय” या नामांकित वृत्तसंस्थेचा एक व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडियोमध्ये कांग्रेसचे वरिष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांनी स्वर्गीय इंदिरा गांधींनी प्रियांका यांच्याबाबत केलेल्या भविष्यवाणी विषयीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कांग्रेसचे वरिष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांनी पूर्व पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केलेल्या एका भविष्यवाणीबाबत सांगितले आहे. फोतेदार सांगतात इंदिराजींनी एकदा, ”माझ्या घरी एक मुलगी आहे, तिचे नाव प्रियांका आहे. तिचे भविष्य फार चांगले आहे. जेव्हा ती मोठी होऊन राजकारणात येईल तेव्हा लोक मला विसरतील, आणि प्रियंकाला स्वीकारतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)