जेव्हा जसलीन म्हणते, ‘लिव्ह इनमध्ये राहिल्यांनंतर प्रॉपर्टी….’ 

सलमान खानाचा विवादित शो ‘बिग बॉस’मध्ये यंदाच्या वर्षी सर्वात विवादित ठरलेली जोडी म्हणजे जसलीन माथारू आणि अनुप जलोटा यांची. या दोंघांच्या वयामध्ये तब्बल 37 वर्षांचे अंतर आहे. या जोडीने आपल्या प्रेमाची कबुली सर्वांना या अगोदरच दिली होती. परंतु, बिग बॉस या आठवड्यासाठी एलिमिनेशनमध्ये जसलीन-अनुप जोडी नॉमिनेट होती.  त्यानंतर अनुप जलोटा यांना सिक्रेट रूममध्ये पाठवण्यात आले.

अनुप जलोटा याना सिक्रेट रूममध्ये पाठवण्यात आल्यानंतर जसलीनच्या वागणुकीत खूप बदल झाला आहे. दीपक कुमार आणि  सोमिल चौधरी  हे आपापसात धीम्या आवाजात तिच्या वर्तनातील बदलाबद्दल बोलत होते. त्यानंतर एकवेळ जसलीनने सोमिलला जो व्यवसायाने वकील आहे त्याला काही विचारले ज्याने तिच्यावर बिग बॉस घराबाहेर खूप चर्चा होत आहे.

तिने सोमिल चौधरला विचारले की, ‘लिव्ह इन मध्ये राहिल्यांनंतर प्रॉपर्टी’… यावर सोमिल चौधरीने तिला गप्प राहण्याचा इशारा केले. अनुप जलोटा हे सिक्रेट रूममधून या सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. जेव्हा ते घरात येतील तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)