मी येथे आल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला  

अहमदाबाद – आमच्यात मतभेद होते पण आता आमची मने जुळली आहेत. मी येथे आल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे, असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, आमच्यातली भांडणे पाहून काहींना आनंद झाला होता. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन भांडत होतो. पण आता आमच्यातले वाद संपले आहेत. कारण आमचे विचार सारखे आहेत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. आम्हाला खुर्चीची ओढ नाही. २५ वर्षे आम्ही सत्तेशिवाय एकत्र होतो. एक भगवा घेऊन आम्ही वाटचाल केली. दिल्लीवर भगवा फडकावण्याचे आमचे स्वप्न होतं. ते २५ वर्षांनी पूर्ण झाले.

यावेळी मोदी मोदी अशा घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, एनडीए आघाडीकडे कोणता नेता आहे? विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी एकही चेहरा नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विरोधकांनी एक सभा घ्यावी आणि एका नेत्याच्या नावे घोषणा करुन दाखवावी, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)