जमिनीवर येताच ‘त्या’ विमानातील प्रवाशांनी सोडला सुटेकचा श्‍वास

लखनऊ : मुंबई ते दिल्ली जाणाऱ्या विस्तारा विमानातील इंधन संपुष्टात आल्याने 153 प्रवाशांनी जीव मुठीत घेवून प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास 4 तास हे विमान हवेत उड्डाण घेत असल्याने इंधन टाकीत फक्त पाच मिनिटं पुरेल इतकं इंधन असल्याने या विमानाचा मोठा अपघात होण्याची शक्‍यता होती.

मुंबईवरून दिल्लीला जाणारे हे विमान पहिल्यांदा लखनऊ येथे वळवण्यात आले. त्यानंतर या विमानाला प्रयागराजला पाठवण्यात आले. लखनऊवरुन प्रयागराजला गेल्यानंतर पुन्हा विमानाला लखनऊला बोलवण्यात आले. अंधूक प्रकाशामुळे विमानाच्या लॅंडिंगला अडचण निर्माण झाली होती. अखेर पायलटने इमरजेन्सी संदेश पाठवल्यानंतर विमानाला लखनऊ येथील विमानतळावर उतरविण्यात आलं त्यावेळी विमानातील इंधन जवळपास संपलेले होते.

चांगले हवामान आणि लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे या विमानाचा मोठा अपघात टळला. लखनऊ ते प्रयागराज येथील बमरौली विमानतळ जवळपास 200 किमी अंतरावर आहे. हे अंतर पार करण्यासाठी विमानात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध नव्हता. प्रयागराजच्या मार्गावर सात किमी गेल्यानंतर या विमानाला पुन्हा लखनऊला बोलविण्यात आलं. जेथे 20 मिनिटांच्या कालावधीत या विमानाचं लॅंडिंग करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)