तेव्हा अमिताभ बच्चन आणि इम्रान खान आले होते एकत्र 

इम्रान खान यांचा तेहरीक ए इन्साफ हा पक्ष पाकिस्तानमधील निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. ते पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून ११ ऑगस्ट रोजी शपथ देखील घेणार असल्याचे समजते आहे. आपल्या जीवनात सतत प्रकाशझोतात राहिलेल्या इम्रान खान यांच्याशी संबंधित एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ते बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका संगीताच्या कार्यक्रमात दिसतात.

इम्रान खान आणि अमिताभ बच्चन हे ८०च्या दशकात शौकत खानुम मेमोरियल ट्रस्टच्या निधी उभारण्याच्या एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोन दिग्गज नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ हा इम्रान खान यांचा पक्ष शपथविधीसाठी जोरदार तयारी करत असून या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सार्कचे सदस्य असणाऱ्या देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्याच्या विचाराधीन असल्याचे वृत्त आहे.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)