व्हॉटस्‌ अॅॅपवर फोटो पाठवा अन्‌ रेल्वे स्टेशन स्वच्छ करा

9766353772 क्रमांक प्रशासनाकडून जारी

पुणे – रेल्वे स्थानकावरील गैरप्रकार, अस्वच्छतेमुळे त्रास सहन करावा लागतो. मात्र, मध्य रेल्वे पुणे विभागाने यावर उपाय म्हणून एक व्हॉट्‌स अॅॅप नंबर सुरू केला आहे. यावर रेल्वे स्टेशन परिसरातील अस्वच्छता, गैरप्रकाराच्या घटनेचा फोटो प्रशासनाला पाठवू शकणार आहे. यामुळे वेळीच कारवाई शक्‍य होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे स्थानक परिसरात अवैधरित्या सुरू केलेले व्यवसाय यामुळेही परिसरात अस्वच्छता होते. अनेकदा हे प्रशासनाच्या लक्षात येत नाही. यासाठी पुणे रेल्वे व्यवस्थापनाने 9766353772 हा व्हॉट्‌सअॅॅप नंबर सुरू केला आहे. या नंबर सर्वसामान्य प्रवासी अस्वच्छतेचा फोटो थेट प्रशासनाला पाठवू शकेल. ही सेवा 24 तास सुरू राहणार असून प्रवाशांनी यावर तक्रार केल्यास तत्काळ उत्तर दिले जाणार आहे. यानंतर प्रवाशांनी पाठवलेल्या फोटोची खातरजमा करून त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. यासाठी रेल्वे विभागाने एक पोस्टर तयार केले असून ते स्थानकात विविध ठिकाणी ते लावण्यात येणार आहे. यामुळ आता रेल्वेचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)