#नवीन काय वाचाल?: ता.क

मनोविश्‍लेष्णात्मक लक्षवेधी कादंबरी : ता. क. : डॉ. उर्जिता कुलकर्णी 
पुण्यातील ख्यातनाम होमिओपॅथिक सायकॉलॉजिस्ट व सेक्‍सॉलॉजिस्ट डॉ. उर्जिता कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ता. क.’ या पत्ररुप अशा कादंबरीचं मराठी वाचकांनी विशेषत्त्वानं स्वागत केलं पाहिजे. मराठीमध्ये पत्रात्मक कादंबरी लेखनाची फार मोठी परंपरा नाही. त्यातही एखाद्या मानसिक आजाराचं प्रतिबिंब पडेल असा विषय, अत्यंत रंजक आणि वाचकाला बांधून ठेवणाऱ्या शैलीत मांडणं हेही काही सोपं काम नाही. त्यामुळे “ता. क.’ ही कादंबरी वाचकाला एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जाते. या कादंबरीतील पात्रांना नावं नाहीत. तो तिला पत्रं लिहीत असतो आणि मग कथा उलगडत जात असतानाच एक डॉक्‍टर, मग फिलो, छबडू आणि रेने अशी वेगळीच पात्रं कथेमध्ये अवतरत जातात.
वाचकाला शेवटपर्यंत हे समजतच नाही की, तिची अर्थात कथानायिकेची नक्की समस्या तरी काय आहे, आणि त्यावर मार्ग काय आहे. त्यासाठी डॉक्‍टरच्या पत्राची प्रतीक्षा करावी लागते. “ता. क.’ (ताजा कलम) ही एक पत्रात्मक कादंबरी असून यामध्ये हाताळलेला विषय एका वैद्यकीय समस्येशी निगडीत आहे. मात्र, विषय मांडण्याची पद्धत, अगदी बोलीभाषेशी साधर्म्य असलेली कमालीची ओढाळ अशी लेखनशैली आणि पानागणिक उत्सुकता वाढवणारी ही कांदबरी प्रत्येकाच्या संग्रही असणं, अत्यंत आवश्‍यक आहे. मात्र, हे पूर्ण पुस्तक सलग आणि एका बैठकीत वाचले, तर त्याचा आनंद सर्वाधिक घेता येऊ शकेल. एकदा वाचल्यानंतरही अनेकदा वाचायला प्रवृत्त करणारी अशी ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्यविश्‍वात एक मोलाची भर आहे.
सोहम सबनीस यांनी केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ विशेष उल्लेखनीय आहे. अशा वेगळ्या विषयांवरील लेखनाचे मराठी साहित्य विश्‍वात स्वागत होत आहे. सोशल मीडियावर या पुस्तकाचे करण्यात आलेले प्रमोशनही लक्षवेधी असेच ठरले आहे. डॉ. कुलकर्णी यांचे पुस्तक अत्यंत देखण्या स्वरूपात मार्केटमध्ये आले आहे.
– व्यंकटेश लिंबकर 
ता. क. : प्रकाशक : सोहम पब्लिकेशन्स, पुणे. किंमत रु. 200/- 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)