व्हॉट्‌स ऍप “फॉरवर्ड’ ची मर्यादा आता 5 जणांनाच : जगभरात लागू

नवी दिल्ली,  “व्हॉट्‌स ऍप’वरच्या पोस्ट एकावेळी आता केवळ 5 जणांना “फॉरवर्ड’ केल्या जाऊ शकणार आहेत. ही मर्यादा भारतामध्ये गेल्यावर्षी जुलैपासूनच लागू झाली आहे. मात्र आता जगभर “व्हॉट्‌स ऍप’च्या वापरकर्त्यांनाही ही मर्यादा लागू होणार आहे. अफवा आणि बनावट बातम्या पसरवण्यापासून रोखण्यासाठी ही उपाय योजना करण्यात आली आहे. “फेसबुक’कडे मालकी असलेल्या “व्हॉट्‌स ऍप’ने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ब्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे. खासगी मेसेज केवळ अगदी निकटवर्तीयांपुरते मर्यादित रहावेत, यावर “व्हॉट्‌स ऍप’चे लक्ष केंद्रीत असल्याचे या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

“व्हॉट्‌स ऍप’च्या वापरासंदर्भात वापरकर्त्यांकडून मागवण्यात आलेल्या सूचनांचा 6 महिन्यांपासून काळजीपूर्वक विचार केला जात आहे. त्याच्या आधारे “फॉरवर्ड’ ची मर्यादा जगभरात लागू केली जात आहे. आजपासून “व्हॉट्‌स्स ऍप’च्या अत्याधुनिक व्हर्जनचा वापर करणाऱ्यांना केवळ 5 जणांना मेसेज “फॉरवर्ड’केले जाऊ शकतील. “व्हॉट्‌स ऍप’चे जगभरात 1.5 अब्ज वापरकर्ते आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)