इशरतशी तुमचे नाते काय? : अदित्यनाथ यांचा राहुल गांधींना सवाल

अहमदाबाद – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी युपीए सरकारच्या काळात दहशतवाद नियंत्रणात आणण्यास अपयश आल्याचा दावा केला. येथील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी पुन्हा गुजरात मधील इशरत जहॉं चकमक प्रकरण उपस्थित करीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचा इशरतशी संबंध काय हे स्पष्ट करावे असे आव्हान दिले.त्यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की जैश ए महंमद पेक्षा भारतातील लोक भारताचे मोठे शत्रु आहेत असे राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या राजदूताला सांगितले होते.

इशरत जहॉं ही दहशतवादी होती म्हणूनच ती सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाली पण त्या प्रकरणात राहुल गांधी यांनी वारंवार शंका उपस्थित करीत भाजप सरकारवर गंभीर आरोप केले होते त्या पार्श्‍वभूमीवर तुमचा इशरतशी काय संबंध काय असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या बरोबरच प्रियांका गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. राहुल आणि प्रियंका हे केवळ निवडणुकीच्या काळातच मंदिरांमध्ये जातात अन्यथा त्यांना मंदिरात जाण्यास वेळ नसतो असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)