खरी देशभक्ती म्हणजे काय? हे सांगणारे तुम्ही कोण ? – उर्मिला मातोंडकर

बॉलीवूडमधील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने अखेर कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने पक्षप्रवेश केला. यातच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने भाजपाला देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय हे सांगणारे तुम्ही कोण, असा सवाल केला आहे.

उर्मिला मातोंडकरने भाजपाला टीका करत म्हंटले,’युती सरकारनंतर देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण वाढले आहे. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ असं म्हटलं जातं. मात्र हे प्रेम कुठे आहे? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढलं, एकमेकांविषयी द्वेष वाढला.खरी देशभक्ती म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? हे सांगणारे तुम्ही कोण ? तसेच विकासाचं चित्र कुठे आहे? या सरकारने फक्त विकासाची स्वप्नच दाखवली गेली. नोकऱ्या कुठे गेल्या ?, काळा पैसा कुठे गेला ?, असा प्रश्नही उर्मिलाने उपस्थित केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)