त्यांचे काय कर्तृत्त्व आहे?

विखे, पवारांच्या उमेदवारीनंतर विजय शिवतारे यांचा सवाल
पक्षाकडून आदेश आल्यास निर्णय घेईन  ;शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे, याविषयी बोलताना शिवतारे म्हणाले, “शरद पवार यांचे राजकीय क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. परंतु, आगामी निवडणुकीतील वाऱ्याची दिशा समजल्याने माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली.’ बारामती लोकसभा मतदार संघ भाजपकडे असल्याने यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. पक्षाने निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यास पुढील निर्णय घेईन, असे शिवतारे म्हणाले. 

पुणे –  राज्यात लोकसभा जागा वाटपामध्ये सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर येथून सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. या दोघांचे काय कर्तृत्त्व आहे? ती केवळ नेत्याची मुले आहेत, म्हणून त्यांना उमेदवार देणार का? असा सवाल शिवसेनेचे नेते आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

सुजय विखे हे डॉक्‍टर आहेत, असे सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविले जात आहे. समाजात हा एकच डॉक्‍टर नाही, असे शिवतारे म्हणाले. या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करण्याची आवश्‍यकता होती. असा सल्लाही त्यांनी दिला. बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेत
आहेत. सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे हे खासदार म्हणून सुळे यांचे कामे नाही. अशा स्वरुपाची कामे समाजातील अनेक मंडळाचे पदाधिकारी देखील करतात. सुळे यांनी अनेक चांगल्या योजना मतदार संघात आणण्याची आवश्‍यकता होती. मात्र, त्यांनी मागील बारा वर्षांत असे कोणत्याही स्वरुपाचे काम केले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)