जाणून घ्या : काय होता करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराचा वाद

तमिळनाडू राजकारणातील खूप मोठे नाव, पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारविधी वरून मोठा वाद होता. करुणानिधींचे समर्थक करुणानिधी यांच्या पार्थीवाला चेन्नई येथील मरिना बीच येथे बाकीच्या मोठ्या नेत्यांच्या बाजूला अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत आहेत तर सध्याचे एआयआयएमके सरकारने त्यांची विनंती अमान्य केली होती. त्यामुळे त्यांचा दफनविधी मरिना बीच येथे होणार की नाही याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालय करणार होते.

तमिळनाडू सरकारने अगोदर नेत्यांचे पुतळे, स्मारके यांच्यावर चालू असलेल्या खटल्याचे करणे दिले होते तर आज सरकार अन्य कारणांसह पुढे आले.
त्यात जागा न देण्याचे मुख्य कारण म्हणजे, जे विद्यमान मुख्यमंत्री मृत्यू पावतात त्यांनाच तिथे अंत्यसंस्कारविधीसाठी जागा दिली जाते, ही सबब पुढे केली आहे. उदाहरणासाठी त्यांनी एम.जे. रामचंद्रन, अण्णा येदुराई आणि जय ललिता यांचे दाखले दिले आहेत. हे तिघेही मुख्यमंत्रिपदावर असताना गेल्याने त्यांना मरिना बीच वर दफन करण्यात आले.
सरकारने अन्य एक माजी मुख्यमंत्र्याचे उदहारण देत ते मुख्यमंत्री नसताना गेल्याने त्यांना मरिना बीचवर अंत्यसंस्कारविधीसाठी स्थान देण्यात न आल्याचेही सांगितले आहे. यावर करुणानिधी समर्थकांनी याला विरोध करत असा काही नियम नाही, त्यामुळे जागा देण्याची मागणी केली आहे.
यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा चालू होती. मोठ्या संख्येने करुणानिधी समर्थक एकत्र आले होते. काही खांदे समर्थक हा डाव तमिळनाडू सरकारनेच केला असून सरकारद्वारे कटूपणा आणि राजकीय शोषण यावृत्तींची पुनरावृत्ती होत असल्याचे बोलत होते. न्यालयालयाने त्यांच्या पार्थीवाला  मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली आणि तामिळनाडू सरकारला जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)