‘लेझर गायडेड बॉम्ब’ म्हणजे काय?

पुणे – हवाई दलातर्फे मंगळवारी केलेल्या कारवाईमुळे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मोहिमेमध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञान आणि साधने यांच्याबाबतही बरीच चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून घडत आहे. यामध्ये “मिराज-2000′ फायटर जेट या विमानाचा वापरासोबतच “लेझर गायडेड बॉम्ब’ बाबतही चर्चा होत आहे. हा नेमका काय प्रकार आहे, याबबतची माहिती पुढीलप्रमाणे :

लेझर गायडेड बॉम्ब हा एक सर्वसामान्य बॉम्बच असतो. मात्र, त्यावर लेझर किट लावली जाते. जमिनीवरून, विमानाद्वारे अथवा दुसऱ्या सहकारी विमानाद्वारे ही यंत्रणा कार्यान्वित करता येते. या किटच्या माध्यमातून नियोजित लक्ष्यावर लेझरचा निशाणा साधला जातो. यामुळे त्या ठिकाणी लेझरचे रिफ्लेक्‍शन तयार होऊन लक्षाच्या भोवती एक लेझर बास्केट तयार होते. या बास्केटमध्ये बॉम्ब टाकला जातो. अचूक निशाणा हे या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य असल्यानेच सर्जिकल स्ट्राइकसारख्या महत्त्वपूर्ण मोहिमेत हवाई दलाकडून लेझर गायडेड बॉम्बचा वापर करण्यात आला. हवाई दलातील तज्ज्ञांच्या मते, गायडेड बॉम्बची लक्ष भेदण्यातील अचूकता ही 50 टक्के इतकी असते तर अनगायडेड बॉम्बची अचूकता केवळ 5.5 टक्के असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या तंत्रज्ञानाचा शोध युनायटेड स्टेटसतर्फे 1960 साली लावण्यात आला. व्हियेतनामसोबत 1968 साली झालेल्या युद्धाच्यावेळी प्रथमच लेझर गायडेड बॉम्बचा वापर करण्यात आला होता. भारताबाबत सांगायचे झाल्यास “सुदर्शन’ हे भारतीय हवाई दलातील पहिले लेझर किट असून, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट इस्टाब्लिशमेंट(एडीइ) या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे. “मिराज-2000′ व्यतिरिक्त सुखोई, मिग 29 आणि अन्य काही विमांनामधूनही याप्रकारचे बॉम्ब वाहून नेता येतात. या बॉम्बची मारक क्षमता वाढविण्याबाबत सध्या संशोधन सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)