एफएफडी म्हणजे काय? (भाग-१)

बहुतांश बॅंका सध्याच्या काळात 6.5 टक्‍क्‍यांपासून 7.5 टक्‍क्‍कायंपर्यंत व्याज देत आहेत. काही खासगी आणि सहकारी बॅंका आठ टक्‍क्‍यापर्यंत व्याज देत आहेत. परंतु आपल्याला आपत्कालिन स्थितीत पैसे काढायचे असल्यास आपल्याला दंड आकारला जातो. अशा स्थितीत एफएफडी (फ्लेक्‍झी फिक्‍स्ड डिपॉझिट) हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या खात्यात दरमहा मोठी रक्कम जमा होत असेल आणि ती बचत खात्यात राहत असेल तर ती रक्‍कम मुदत ठेवीत ठेवण्यापेक्षा एफएफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा. निश्‍चित रक्कमेनंतरची उर्वरित रक्कम या एफएफडीत आपोआप जमा होईल आणि व्याजदर नियमित एफडीप्रमाणे मिळेल. अर्थात रक्कम काढल्यास पेनल्टीही आकारली जात नाही.

एफएफडी म्हणजे काय? (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक काळ होता की, बॅंका दिर्घकाळाच्या मुदतठेवीवर 14 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज देत होत्या. मात्र कालांतराने व्याजदरात घसरण झाली आणि सध्याच्या काळात बॅंक आता मुदत ठेवीवर केवळ 6.5 टक्‍क्‍यांपासून 7.5 टक्के व्याज देत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून मुदत ठेवीत पैसे ठेवणारे गुंतवणूकदार आता तुलनेने चांगला परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराकडे वळत आहेत. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात मिळणारा परतावा हा मुदत ठेवीच्या तुलनेत अधिकच असतो, मात्र या दोन्हीतील गुंतवणूकीत जोखीम अधिक असते. गुंतवणुकीचा सोपा फॉर्म्यूला म्हणजे, जेवढी अधिक जोखीम, तेवढा परतावाही अधिक. जे गुंतवणूकदार जोखीम उचलण्याची क्षमता राखतात, तेच म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर अधिक विश्‍वास ठेवतात. मात्र ज्या गुंतवणूकदारांकडे जोखीम उचलण्याची क्षमता नाही, ते आजही बॅंकेच्या मुदत ठेवी योजनेत पैसे ठेवतात. या कारणामुळेच सध्या मुदत ठेवीचे व्याजदर कमी असूनही त्याचे आकर्षण अजूनही कमी झालेले नाही. बॅंकिंग क्षेत्रातील नियमानुसार आपण बॅंकेत कितीही पैसा जमा केला किंवा बॅंक दिवाळखोरीत निघाली असेल तर सरकार आपल्या खात्यात जमा असलेल्या रक्कमेपैकी केवळ एक लाख रुपये परत करण्याची जबाबदारी उचलते. हा नियम खातेदारांसाठी योग्य नसतानाही लोकांचा बॅंकेप्रती विश्‍वास कायम आहे आणि याच कारणामुळे कमी व्याजदर असतानाही नागरिक मुदत ठेवीला सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून मानतात. जर आपल्या खात्यात काही अतिरिक्त रक्कम पडून असेल आणि ही रक्कम मुदत ठेवीमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर बॅंकेने एफडीशिवाय एफएफडी म्हणजेच फ्लेक्‍झी फिक्‍स्ड डिपॉझिटचा पर्याय सुरू केला आहे. या पर्यायाच्या आधारे गुंतवणुकदारांना अनेक लाभ मिळू शकतात.

– अनिल विद्याधर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)